धमकी प्रकरणावरून नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा

मुंबई, १५ जून,२०२३, प्रतिनिधी : ‘खोट बोलण राऊतांच्या रक्तातच आहे’, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राऊत धमकी प्रकरणात मयुर  शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंद याने धमकीचा कट रचला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले, “राऊतांनी […]

धमकी प्रकरणावरून नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा

मुंबई, १५ जून,२०२३, प्रतिनिधी : ‘खोट बोलण राऊतांच्या रक्तातच आहे’, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. राऊत धमकी प्रकरणात मयुर  शिंदेला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय आहे. राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी मयुर शिंद याने धमकीचा कट रचला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितेश राणे म्हणाले, “राऊतांनी कार्यकर्त्याला धमकी देण्यास सांगून फोन रेकॉर्ड केला आहे. खोट बोलणं हे राऊत यांच्या रक्तात आहे. संजय राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून मी याला भांडुपचा देवानंद म्हणतो. स्वत:च्याच कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी द्यायचा कॉल करवून घ्यायचा आणि आपल्याला धमकी मिळाल्याचं सांगून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची. हा संजय राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे.”

“संजय राऊतांसारख्या खोटारड्या लोकांचं महाराष्ट्र सरकारने दिलेलं संरक्षण काढून टाकावं. यापुढे संजय राऊतवर महाराष्ट्रानं किती विश्वास ठेवावा, याबद्दल खरंच विचार करावा लागेल. जो स्वतःच्या मालकाचा झाला नाही, स्वतःच्या धर्माचा झाला नाही तो तुमचा आमचा काय होणार हे विचाराव महाराष्ट्रान, अशी टीका राणेनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number