संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यानुसार त्यांना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने दर सोमवारी ओरोस पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट नितेश राणे यांना घातली आहे. न्यायालयाच्या अटीनुसार, नितेश राणेंनी ओरोस पोलीस स्थानकात हजेरी लावली आहे. तसेच नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनीदेखील ओरोस पोलीस स्थानकात हजेरी लावली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला असून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. ३० हजारांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना जामीन मंजूर झाला आहे.