माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून भाजपचा रस्ता धरला आहे, तर त्यांचे पुत्र नितेश राणे हे देखील काँग्रेसमधून बाहेर पडून आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाणार आहेत. यासंदर्भात नितेश राणे यांनी ट्विटही केलं आहे. नितेश यांनी या ट्विटमध्ये चक्क खा. छत्रपती उदयनराजे भोसलेंनाही निमंत्रित केलं आहे.
उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत..
मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे ..
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे! — nitesh rane (@NiteshNRane) October 8, 2018
छ. उदयनराजे यांच्यासारखा बलाढ्य नेता हा आपल्या पक्षात असावा, अशी प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते. सध्या उदयनराजे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असले, तरी पक्षातील इतर नेत्यांशी त्यांचे संबंध तणावपूर्ण आहेत. तसंच उदयनराजे पक्ष सोडणार असल्याची चर्चाही वारंवार होतं असते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची ऑफर ही सूचक आहे. उदयनराजेंचं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत आहे, अशा नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.