जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने मुसंडी मारलीये.
शिवसेनेनेही काही जागा घेत जिल्ह्यात आपली ताकद अजूनही असल्याचे दाखवून दिलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात 95 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झालेत.
यात 47 जागांवर समर्थ विकास पॅनेलने तर 27 जागा शिवसेनेने पटकावल्यात.
तर, याच विजयानंतर नितेश राणेंनी नारायण राणे मंत्रीमंडळात बसले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल असं म्हटलंय.