जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे. नीरव मोदीने कर्जासंदर्भात आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भात पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेला एक पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्याने कर्ज 5 हजार कोटींचे घेतले असल्याचे म्हटले आहे. तसेच, आता मी हे कर्ज फेडू शकत नाही असेही म्हटले आहे.
बँकेने हे सगळे प्रकरण चव्हाट्यावर आणले त्यामुळे माझा हिरे आणि दागिने व्यवसाय बुडाला, माझ्या मालमत्तांवर जप्ती आली त्यामुळे आता मी कर्ज फेडू शकत नाही असेही नीरव मोदीने म्हटले आहे.
नीरव मोदीने नक्की पत्रात काय लिहीलय :
पीएनबी बँकेने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितल आहे. आपल्या कंपन्यांवर पीएनबीबँकेचं कर्ज हे 5 हजार कोटींपेक्षाही कमी आहे. पीएनबी बँकने चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. त्यामुळे माझ्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. कर्जाची परतफेड करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे. त्यामुळे कर्ज परतफेड करण्यास आम्ही असमर्थ आहोत. बँकेने कर्ज वसूल करण्यासाठी केलेल्या घाईमध्ये माझ्या ब्रँडचा व्यवसाय उदध्वस्त केला आहे. माझ्या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्यामुळे कर्जाची परतफेड करण्याचेमाझे सर्व मार्गही बंद झालेत. या प्रकरणाशी माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही, तरीही माझ्या पत्नीला आणि मामा मेहुल चोक्सी यांच नावही या प्रकरणात चुकीच्या पध्दतीने ओढण्यात आलं आहे. माझ्या व्यवसायाशी मामाचा किंवा माझ्या इतर कुटुंबयींचा कोणत्याही प्रकाराचा संबंध नाही. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही. 2 हजार 200 कर्मचाऱ्यांचं वेतन सध्याच्या खात्यातून देण्याची परवानगी देण्यात यावी. असं या पत्रात नीरव मोदीने लिहील आहे.