निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून देणार कमळाला साथ

  जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे  राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. यापुढील वाटचाल मी लवकरच […]

निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून देणार कमळाला साथ

 

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे 

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. यापुढील वाटचाल मी लवकरच जाहीर करेन. असं त्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत डावखरे भाजपात जाणार आहेत. निरंजन डावखरे हे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे सुपूत्र आहेत. त्यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामाही दिला आहे. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.

मात्र आता ते राजीनामा देऊन भाजपात जाणार असल्यानं राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे

 

मनसेच्या इंजिनाला धक्का बसण्याची शक्यता, शिशीर शिंदे स्वगृही परतणार ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number