जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकार आता नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेणार आहे.
दहावीप्रमाणे नववीतील विद्यार्थ्यांनाही पुन्हा संधी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.
माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, हा या निर्णयामागे उद्देश आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2017-2018 पासून नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जून महिन्यात पुनर्परीक्षा घेतली जाईल. शालेय स्तरावरच ही परीक्षा होईल, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.