भारतीय शेअर बाजारात गुरुवारी जोरदार तेजी पाहायला मिळत आहेत. निफ्टी 50 निर्देशांकाने व्यवहारदरम्यान आपले सर्वकालीन उच्चांक पातळी गाठत 26,300 जवळ स्थिरता दाखवली. सकाळी 9:30 वाजता निफ्टी 50 हा 26,276.25 वर होता, म्हणजेच 71 अंकांची (0.27 टक्के) वाढ. तर BSE Sensex 85,877.89 वर पोहोचत 268 अंकांनी (0.31टक्के) मजबूत स्थितीत दिसला.
विश्लेषकांच्या मते, Q3 मधील मागणी वाढ, भांडवली गुंतवणुकीत सुधारणा आणि RBI तसेच US Federal Reserve कडून अपेक्षित व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे बाजारातील सकारात्मक वातावरण कायम आहे. त्यामुळे निर्देशांकांना नवीन उच्चांक गाठण्याची संधी मिळत आहे. Geojit Investments Limited चे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार डॉ. व्हीके विजयकुमार यांनी सांगितले की, “निफ्टीमधील कालच्या 320 अंकांच्या उडीनंतर बाजाराचा मूड पूर्णपणे तेजीकडे आहे. Foreign portfolio investors (FPI) यांच्या मोठ्या शॉर्ट पोजिशनमुळे तांत्रिकदृष्ट्याही अनुकूल वातावरण आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये अपेक्षित नफा वाढ हा या तेजीचा मूलभूत आधार आहे.”
ऑक्टोबरमध्ये दिसलेला जबरदस्त खरेदी ट्रेंड आगामी तिमाहींच्या नफ्यात परावर्तित होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. मात्र उच्च मूल्यमापनामुळे दीर्घकाळ टिकणारी आक्रमक तेजी सध्या संभवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषत: Bank Nifty कडे नवीन उच्चांक गाठण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील तेजी आणि Federal Reserve कडून डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीची वाढती शक्यता यामुळे बुधवारी US बाजार बंद झाले. त्याचाच सकारात्मक परिणाम आज आशियाई बाजारातही दिसत आहे.
दरम्यान, सोन्याच्या किमतींमध्ये स्थिरता असून गुंतवणूकदार US Fed च्या आगामी व्याजदर निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. बुधवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign portfolio investors, FPI) 4,778 कोटींची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Domestic institutional investors, DII) 6,248 कोटींची खरेदी केली.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!