Nida Khan: नाशिक TCS धर्मांतरप्रकरणी राष्ट्रिय महिला आयोगाचा अहवाल फडणवीसांसमोर सादर

टीसीएस नाशिक प्रकरणी  राष्ट्रीय महिला आयोगाने सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना सादर केला आहे. यावेळी आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाईचे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिले.  पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. 50 हून अधिक पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून अहवालात 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत. […]

Nida Khan: नाशिक TCS धर्मांतरप्रकरणी राष्ट्रिय महिला आयोगाचा अहवाल फडणवीसांसमोर सादर

टीसीएस नाशिक प्रकरणी  राष्ट्रीय महिला आयोगाने सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना सादर केला आहे. यावेळी आयोगाच्या शिफारशींनुसार कठोर आणि प्रभावी कारवाईचे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिले.  पीडित महिला, पोलीस अधिकारी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. 50 हून अधिक पानांचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असून अहवालात 25 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी आहेत. कार्यस्थळी महिलांची सुरक्षा, सन्मान आणि न्याय सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. 

नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 मेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आज पासून तिची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशी दरम्यान नाशिक पोलीस काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच प्रकरणात अटकेत असलेले इतर आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांचीही चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

धर्मातर प्रकरणात निदाचा प्रत्यक्ष काय रोल होता. 25 मार्च निदा खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तेव्हापासून निदा कुठे होती? कोणाकोणाच्या संपर्कात होती? मुंब्रा, मुंबई, भिवंडी याभागात तिला कोणी आश्रय दिला? मतीन पटेलचा संबंध कधीपासून होता , मतीन पटेल आणि निदा खानची ओळख कशी आणि कोणाच्या माध्यमातून झाली? निदा खानचे मालेगाव आणि मलेशिया कनेक्शन काही आहे का? मलेशियातील इम्राचा आणि निदाचा काही संबंध आहे का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं एसआयटी शोधणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number