मुंबई आणि पुण्यात एनआयए ची छापेमारी

एनआयए महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणार छापेमारी सुरु केली आहे. दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. एनआयए ने आयएसआयएस च्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याच्या संशयावरून संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबई आणि पुण्यात […]

मुंबई आणि पुण्यात एनआयए ची छापेमारी

एनआयए महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणार छापेमारी सुरु केली आहे. दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एनआयएकडून मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

एनआयए ने आयएसआयएस च्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याच्या संशयावरून संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबई आणि पुण्यात एनआयए आणि मुंबई पोलिसांनी चार ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने मुंबई आणि पुण्यात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत. आयएसआयएस च्या संपर्कात असलेल्याच्या संशयावरून चौघांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथील एका रहिवाशा विरुद्ध एनआयएने २८ जून रोजी गुन्हा दाखल केला होता.

आणखी काही जण संपर्कात असल्याचा एनआयएला संशय होता. त्यानुसार सोमवारी छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईतील दोन, तर भिवंडीतील पडघा येथे दोन आणि पुण्यात एकाला अटक करण्यात आले आहे. एनआयएने मुंबई आणि भिवंडी प्रत्येकी दोन-दोन ठिकाणी आणि पुण्यात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहेत.मुंबईसह पुण्यात एनआयए कडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. नागपाडा येथील नागपाडा पोलीस ठाण्याजवळ छापा टाकण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number