NFSU Admission 2026: 12 वी नंतर फॉरेन्सिक सायन्समध्ये करिअरची सुवर्णसंधी! NFSU मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

विविध कोर्सेस, फी आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

NFSU Admission 2026: 12 वी नंतर फॉरेन्सिक सायन्समध्ये करिअरची सुवर्णसंधी! NFSU मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ National Forensic Sciences University (NFSU) ने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध फॉरेन्सिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी असून, आधुनिक आणि करिअर-केंद्रित शिक्षणाद्वारे भवितव्य घडवण्याचा मार्ग खुला झाला आहे. देशभरातील 13 कॅम्पसच्या माध्यमातून एनएफएसयू उच्च दर्जाचे शिक्षण प्रदान करते.

या कॅम्पसमध्ये गांधीनगर, दिल्ली, पुणे, भोपाळ, गुवाहाटी, वाराणसी, जयपूर, चेन्नई आदी प्रमुख शहरांचा समावेश आहे. विद्यार्थी त्यांच्या सोयीप्रमाणे कोणत्याही कॅम्पसमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. येथे फॉरेन्सिक सायन्ससह अनेक आधुनिक विषयांचे शिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतात.

फी संरचना अभ्यासक्रम आणि कॅम्पसनुसार बदलते. साधारणपणे 12वी नंतरच्या बॅचलर कोर्सेसची वार्षिक फी सुमारे 50,000 ते 1.5 लाख रुपयांदरम्यान असते. पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड कोर्सेससाठी ही फी सुमारे एक लाख ते 2.5 लाख रुपये प्रति वर्ष इतकी असू शकते. तर मास्टर्स अभ्यासक्रमांसाठी फी साधारण 60,000 ते दोन लाख रुपये प्रति वर्ष असते. काही कोर्सेसमध्ये प्रयोगशाळा, परीक्षा किंवा वसतिगृहाशी संबंधित अतिरिक्त शुल्कही आकारले जाऊ शकते, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळ तपासणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Tax Compliance Calendar : ITR पासून TDS पर्यंत; करदात्यांनी 'या' महत्त्वाच्या तारखा वेळीच ठेवा नोंदवून

12वी नंतर फॉरेन्सिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनएफएसयू विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे. यामध्ये बीएससी क्रिमिनोलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स, पाच वर्षांचा इंटिग्रेटेड बीएससी-एमएससी फॉरेन्सिक सायन्स, तसेच बीबीए-एमबीए (फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फसवणूक तपास) यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या कोर्सेसमधून विद्यार्थ्यांना क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशन, डीएनए विश्लेषण, सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

याशिवाय, पुढील शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. सायबर सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक्स, क्लिनिकल सायकोलॉजी, न्यूरोसायकॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या विषयांमध्ये विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एकूण 40 हून अधिक अभ्यासक्रम विविध विभागांअंतर्गत राबवले जात असून, त्यांची पात्रता आणि कालावधी वेगवेगळा आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ www.nfsu.ac.in वर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगिन करून इच्छित अभ्यासक्रम निवडावा, अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि निर्धारित शुल्क भरावे. शेवटी अर्ज सादर करून त्याची प्रिंट सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. 

हेही वाचा: Narendra Modi: नव्या संसदेत घुमणार नारीशक्तीचा आवाज; महिलांच्या कार्याचे विशेष कौतुक करत पंतप्रधान मोदींनी सांगितला महिला आरक्षणाचा 'मास्टर प्लॅन'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number