‘पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर काढणार’ – संजय राऊत

केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यानंतर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंवर प्रतिहल्ला केला आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीला आव्हान दिले आहे. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीची भीती घालून […]

‘पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा भ्रष्टाचार बाहेर काढणार’ – संजय राऊत

केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यानंतर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंवर प्रतिहल्ला केला आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीला आव्हान दिले आहे. पुढील आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीची भीती घालून सर्वांच्या कुंडल्या हातात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला कुंडल्या काढायच्या धमक्या देऊ नका, तुमच्यही कुंडल्या आमच्या हातात आहेत. त्यामुळे एक दिवस असा येईल की, तुम्हाला तुरुंगात बसून तुमच्याच कुंडल्या बघाव्या लागणार, असे संजय राऊत म्हणाले.

ईडीचे अधिकारी कसे मोठ्या घोटाळ्यात सहभागी आहेत याचा आम्ही उलगडा करणार आहोत. पुढील आठवड्यात याच ठिकाणी बसून ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number