मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा “न्यूटन” चित्रपट ऑक्सरच्या शर्यतीत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन हा चित्रपट भारताकडून ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत असणार आहे.   ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृतपणे न्यूटनची निवड करण्यात आली आहे.   फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म कॅटेगरीमध्ये न्यूटनला नामांकन मिळाले आहे. अभिनेता राजकुमार राव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अंजली पाटिल, रघुबीर यादव यांचाही तगडा […]

मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा “न्यूटन” चित्रपट ऑक्सरच्या शर्यतीत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा न्यूटन हा चित्रपट भारताकडून ऑस्कर 2018 पुरस्काराच्या शर्यतीत असणार आहे.

 

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृतपणे न्यूटनची निवड करण्यात आली आहे.

 

फॉरेन लॅन्ग्वेज फिल्म कॅटेगरीमध्ये न्यूटनला नामांकन मिळाले आहे. अभिनेता राजकुमार राव या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अंजली पाटिल, रघुबीर यादव यांचाही तगडा अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो.

 

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने आज याबाबत घोषणा केली. तेलगू सिनेमाचे प्रसीद्ध निर्माते सीव्ही रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालीही समिती नेमण्यात आली होती. ऑस्करमध्ये पाठवण्यासाठी 26 चित्रपटांचा विचार झाला पण त्यापैकी न्यूटनची एकमताने निवड करण्यात आली अशी माहिती रेड्डी यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number