‘सामनासारखं वृत्तपत्र राज्यात बंद झालं पाहिजे’

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ‘सामना वृत्तपत्र बंद झालं पाहिजे’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या ‘फडतूस गृहमंत्री’ या वक्तव्यावर नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. यावेळी, ‘सामनासारखं वृत्तपत्र राज्यात बंद झालं पाहिजे’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तसेच, ‘सामना वृत्तपत्राविरोधात न्यायालयात […]

‘सामनासारखं वृत्तपत्र राज्यात बंद झालं पाहिजे’

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ‘सामना वृत्तपत्र बंद झालं पाहिजे’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या ‘फडतूस गृहमंत्री’ या वक्तव्यावर नारायण राणे यांनी हल्लाबोल केला. यावेळी, ‘सामनासारखं वृत्तपत्र राज्यात बंद झालं पाहिजे’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तसेच, ‘सामना वृत्तपत्राविरोधात न्यायालयात जाणार’, असल्याचेही नारायण राणे यांनी सांगितले. ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी सामनासारखे वृत्तपत्र सुरु राहावे का यावर विचार करावा.’ ‘कोणी तक्रार केली नाही तर, प्रेस काउंसिलकडे मी तक्रार करेन’, असं नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.

काय बोलले होते उद्धव ठाकरे ?

मंगळवारी ( ४ एप्रिल ) रोजी उद्धव ठाकरे यांनी “महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय.” “ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे, मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील या वक्तव्यामुळे नारायण राणे यांनी बुधवारी ( ५ एप्रिल ) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा खडा समाचार घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number