जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आजच्या सामनामधून बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या महाबुडव्यांना वेसण घाला अशी टिका सरकारवर करण्यात आलीय. देशातील सर्वोच्च न्यायालयाने बँकाना खड्ड्यात घालणाऱ्या महाबुडव्यांची थकीत कर्जदारांची यादी जाहीर करा.
अशी टीका आजच्या संपादकीयमधून शिवसेनेन सरकारवर केलीय. देशातील बँका जगवायच्या असतील तर महाबुडव्यांना वेसण घालावीच लागेल. 7.34 लाख कोटींचा एनपीए असणारा देश आर्थिक महासत्ता कसा होईल?
अशा टिकेचे ताशेरे सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर नाव न घेता केली आहे.