जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती
अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्याचबरोबर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली.
याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस आणि रुग्णालयातील एक टीम या प्रकाराची चौकशी करणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी डॉ. भूषण कट्टावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.