जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण
कल्याणच्या नेवाळीत जमिन संपादनावरुन झालेल्या शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी शेकडो आंदोलकांना अटक केली. या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
आंदोलनानंतर पोलीस नेवाळी भागातील गावात दहशत माजवत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. तसंच अटकेत असणाऱ्या आंदोलकांवर पोलीस अत्याचार करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तर अन्यायविरोधात आवाज उठवत आगरी समाज एकवटला होता.
त्याचप्रमाणे काही आगरी महिलांनी पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत अटकेत असलेल्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा आरोप केला. तर आमदार गणपत गायकवाड हे थर्ड डिग्री टॉर्चर करत असल्याचा गंभीर आरोप केला.