वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तुम्हाला जर वीवोचा स्वस्त आणि मस्त असा नवीन स्मार्ट फोन घ्यायचा असेल तर डोन्टवरी वीवो तुमच्यासाठी घेऊन आला आहे एक मस्त असा स्मार्टफोन. वीवो कपंनीने V9 च्या यशानंतर बेजल लेस डिस्पले असणारा स्मार्टफोन ‘वीवो Y83’ नुकताच लाँच केला आहे. या स्मार्ट फोनला कमी बजेट असलेल्या रेंजमध्ये लाँच करण्यात आलं आहे. हा स्मार्ट फोन ऑरोरा व्हाइट, पोलर ब्लॅक आणि चार्म रेड या 3 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्ट फोनमध्ये बेजल लेस डिस्प्लेसह नॉचही देण्यात आला आहे. या फोनचा लूक ‘V9’ आणि ‘V9 युथ’ सारखाच आहे.
वीवो Y83 चे फीचर्स
6.22 इंचचा फुल – व्यु आईपीएस एचडी प्लस डिस्प्ले
P22 ऑक्टोकोर प्रोसेसर
4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल मेमरी
एंड्रॉईड ओरियो 8.0 आणि फनटच ओएस 4.0
13 मोगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
सेल्फी कॅमेऱ्यासह फेश रिकॉगनिशन, फिगंरप्रिंट स्कैनर
3,260 एमएएचचची बॅटरी