तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नवे नियम

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी विश्वस्त कोट्यातूनही दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. अभिषेकासाठी पाचशे रुपये आकारण्यात येतील. तुळजाभावी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून, सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त कोट्यातून भाविकांना व्हीआयपी दर्शनाची मोफत मुभा यापूर्वी उपलब्ध करून दिली जात होती. त्यात आता बदल करण्यात […]

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नवे नियम

मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी विश्वस्त कोट्यातूनही दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. अभिषेकासाठी पाचशे रुपये आकारण्यात येतील. तुळजाभावी मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून, सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त कोट्यातून भाविकांना व्हीआयपी दर्शनाची मोफत मुभा यापूर्वी उपलब्ध करून दिली जात होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. विश्वस्त कोट्यातून व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर अभिषेक पूजेसाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जावे, असा ठरावही मंदिर समितीने संमत केला आहे. सोमवार दहा जुलैपासून वरील दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळाची बैठक चार जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. विश्वस्त कोट्यातील व्हीआयपी दर्शन पास आणि अभिषेक पासबाबत यापूर्वी घेण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये वरील निर्णय घेण्यात आले. सोमवारपासून दोन्ही ठरावांची अंमलबजावणी करण्यात यावी आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहेत. दरम्यान, भाविकांकडून धार्मिक विधी कर अधिक आकारू नये. त्यास पुजारी बांधवांचा विरोध असल्याचे निवेदन तुळजाभवानी पुजारी मंडळाकडून जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना देण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number