तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पाश्चिमात्य कपड्यांवर प्रवेशबंदी घालण्यात आली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थेने हा निर्णय घेतला आहे. हा विषय चर्चेत असतानाच आता अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावच्या महागणपती मंदिरातही या निर्णयाची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान संस्थेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रांजणगाव महागणपती देवस्थान संस्थांनी याबाबची नोटीस लावली आहे. या जाहिर नोटीसवर ‘सर्व भाविकांना कळवण्यात येत आहे की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.’, असे या नोटीसमध्ये लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता या निर्णयाचे भाविकांमध्ये काय पडसाद उमटतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.