कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी नवा खुलासा

पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पुण्यातील डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या प्रयोगशाळेचे संचालक कुरुलकर यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ३ मे रोजी अटक केली होती. दरम्यान चौकशीदरम्यान डीआरडीओकडून मोठी चूक झाली आहे. डीआरडीओने एटीएसला चुकीच्या माणसाचा लॅपटॉप […]

कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी नवा खुलासा

पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पुण्यातील डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या प्रयोगशाळेचे संचालक कुरुलकर यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ३ मे रोजी अटक केली होती.

दरम्यान चौकशीदरम्यान डीआरडीओकडून मोठी चूक झाली आहे. डीआरडीओने एटीएसला चुकीच्या माणसाचा लॅपटॉप तपासासाठी दिला. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचा लॅपटॉप तपासणीसाठी मागितला होता. तर डीआरडीओने कुरुलकर यांचा लॅपटॉप देण्याऐवजी चुकीच्या माणसाचा लॅपटॉप दिला. डीआरडीओची ही चूक एटीएसने लक्षात आणून दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number