राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन चिंतेत आले असून खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. दरम्यान वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून नवे नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये कार्यक्रमांना ५० नागरिकांनाच उपस्थितीच परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्ययात्रेसाठी २० लोकांना उपस्थिती बंधनकारक असणार आहे. तर विशेष म्हणजे पर्यटनस्थळावर जमावबंदीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.