राज्यात नवी नियमावली जाहीर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तर मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी २०,३९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली […]

राज्यात नवी नियमावली जाहीर

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तर मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत शनिवारी २०,३९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

रविवारी मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्यात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील जलतरण तलाव, स्पा आणि व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर शाळा, महाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत.

राज्यातील मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद असणार असून उपनगरीय सेवेवर प्रतिबंध नसून लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांना अनुमती देण्यात आली आहे. आणि चित्रपटगृह, नाट्यगृह रात्री १० पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू असणार आहे. दरम्यान लसीकरण झालेल्यांनाच खासगी कार्यालयात प्रवेश असणार असून केशकर्तनालय आणि खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number