गुलाबी थंडीसह थर्टी फस्टची मजा लुटण्यासाठी इंदापूर गाठा

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती गुलाबी थंडीची मजा आणि विकेंडबरोबर थर्टी फस्ट साजरा करायचा असेल तर, सोलापूर महामार्गावरचं इंदापूर गाठायला हवं. याठिकाणी एकाच दिवशी चार स्थळांना भेट देण्याचा आनंद घेता येईल. उजनी धरण, कुंभारगावमधील पक्षी तसेच, हवा मल्लिनाथ आश्रमाला याठिकाणी भेट देऊ शकता. थंडीची चाहूल लागताच उजनी जलाशयावर रोहीत पक्ष्यांसह 30 ते 40 विविध जातीचे पक्षी […]

गुलाबी थंडीसह थर्टी फस्टची मजा लुटण्यासाठी इंदापूर गाठा

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

गुलाबी थंडीची मजा आणि विकेंडबरोबर थर्टी फस्ट साजरा करायचा असेल तर, सोलापूर महामार्गावरचं इंदापूर गाठायला हवं. याठिकाणी एकाच दिवशी चार स्थळांना भेट देण्याचा आनंद घेता येईल. उजनी धरण, कुंभारगावमधील पक्षी तसेच, हवा मल्लिनाथ आश्रमाला याठिकाणी भेट देऊ शकता.

थंडीची चाहूल लागताच उजनी जलाशयावर रोहीत पक्ष्यांसह 30 ते 40 विविध जातीचे पक्षी याठिकाणी हजेरी लावतात. सातासमुद्रापारचे फ्लेमिंगो हजारो किलो मीटरचे अंतर पार करून येतात. तसेच, हवा मल्लिनाथ आश्रमात एक गुहा आहे. रामायण महाभारतातील सर्व प्रसंग याठिकाणी साकारलेले पाहायला मिळतात. या आश्रमाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जाही दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number