जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
वाशी परिसरातील 3 वर्षीय मुलाचे अपहरण करणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रघु नाना शिंदे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.
बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास वाशी रेल्वे स्टेशनवरुन पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेनमधून अपहरणकर्ता त्या चिमुरड्याला घेऊन जात होता. त्याचा हा संपूर्ण प्रकार वाशी रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आरोपीच्या चालण्यावरुन तो नशेमध्ये असल्याचे दिसून आले आहे. सदर प्रकरणाबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.