New Railway Line: विदर्भाच्या विकासाला नवी गती, मुकुटबन-गडचांदूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग; केंद्र सरकारकडून 493 कोटी मंजूर

यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर ही दोन्ही महत्त्वाची औद्योगिक आणि खाणकाम केंद्रे म्हणून ओळखली जातात.

New Railway Line: विदर्भाच्या विकासाला नवी गती, मुकुटबन-गडचांदूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग; केंद्र सरकारकडून 493 कोटी मंजूर

New Railway Line:  भारतीय रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील मुकुटबन ते गडचांदूर दरम्यान 38.21 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 493 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर ही दोन्ही महत्त्वाची औद्योगिक आणि खाणकाम केंद्रे म्हणून ओळखली जातात. या भागात विविध सिमेंट प्रकल्प, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या (WCL) कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. या नवीन रेल्वे मार्गामुळे या औद्योगिक क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी अत्यंत मजबूत होणार असून मालवाहतुकीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

अंतर अन् खर्च कमी करणारा पर्यायी मार्ग 

हा नवीन रेल्वे मार्ग प्रवासाचे अंतर, वेळ आणि वाहतूक खर्च कमी करून एक अत्यंत कार्यक्षम मार्ग उपलब्ध करून देईल. सध्याच्या वर्धा-माणिकगड मार्गावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरेल. याशिवाय, अतिशय व्यस्त असलेल्या बल्लारशाह-नागपूर रेल्वे मार्गावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (DPR), ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर यावरून वार्षिक 6.08 दशलक्ष टन मालवाहतूक होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी दोन्ही दिशांना दररोज प्रत्येकी 2 जोड्या MEMU गाड्या चालवण्याचे नियोजन आहे. मालवाहतुकीमध्ये प्रामुख्याने कोळसा, सिमेंट, स्पंज आयर्न, लोखंड, पोलाद, खते आणि अन्नधान्य यांचा समावेश असेल.

मजरी-नांदेड मार्गाशी थेट संपर्क आणि प्रादेशिक आर्थिक विकास

ही नवीन रेल्वे लाईन कोळसा व सिमेंट क्लस्टर्स आणि मजरी-नांदेड रेल्वे मार्गादरम्यान थेट संपर्क प्रस्थापित करेल. यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये होणारी कोळसा आणि सिमेंटची वाहतूक अधिक जलद गतीने होईल. यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील तुलनेने दुर्लक्षित असलेल्या भागांमध्ये उत्तम रेल्वे जाळे निर्माण झाल्याने या भागाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

हेही वाचा – UPI Transactions Rule: UPI वरील शुल्काबाबबत, 'प्रश्न शुल्क रकमेचा नाही तर…' काय म्हणाले राज ठाकरे

पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

या प्रकल्पामुळे प्रादेशिक रेल्वे जाळ्याची क्षमता वाढणार असून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक सुलभ होईल. माल आणि प्रवासी वाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील प्रादेशिक अर्थकारणाला मोठा हातभार लागेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number