TikTok मुळे टीका, आता नागपूर पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन!

तडीपार गुंडाने पोलीस वाहनात TikTok व्हिडिओ केल्यानंतर नागपूर पोलिसांवर संपूर्ण राज्यातून टीका झाली. त्यांनतर गुंडांना आवरण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यापासून दरोडेखोर, रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांच्यावर नागपूर पोलीसांनी मोठी कारवाई सुरु केलीय. https://www.jaimaharashtranews.com/criminal-shoots-tik-tok-video-in-police-van/   गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात! या दरम्यान पोलीसांनी चोरट्यांच्या दोन मोठ्या टोळ्या जेरबंद केल्या. दरोडा घालणाऱ्या टोळीकडून सुरा, एका […]

TikTok मुळे टीका, आता नागपूर पोलिसांचा अ‍ॅक्शन प्लॅन!

तडीपार गुंडाने पोलीस वाहनात TikTok व्हिडिओ केल्यानंतर नागपूर पोलिसांवर संपूर्ण राज्यातून टीका झाली. त्यांनतर गुंडांना आवरण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यापासून दरोडेखोर, रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांच्यावर नागपूर पोलीसांनी मोठी कारवाई सुरु केलीय.

https://www.jaimaharashtranews.com/criminal-shoots-tik-tok-video-in-police-van/

 

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात!

या दरम्यान पोलीसांनी चोरट्यांच्या दोन मोठ्या टोळ्या जेरबंद केल्या.

दरोडा घालणाऱ्या टोळीकडून सुरा, एका लाख पेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली.

तर वाहन चोरी करणाऱ्या टोळीकडून 10 पेक्षा जास्त बाईक्स जप्त केल्या.

दोन्ही प्रकरणात 9 आरोपी असून यातील सहा अल्पवयीन आरोपी आहेत.

अल्पवयीन मुलं वाहन चोरी करायचे आणि मोठे आरोपी दरोडा घालायचे अशी माहिती पोलिसांनी दिली.

काय घडलं होतं?

सय्यद मोबीन अहमद या फरार असलेल्या नामी गुंडाने चक्क पोलिसांच्या गाडी मधून बाहेर पडतानाचा टिकटॉक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमुळे नागपूर पोलिसांवर टीका झाली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number