मुंबई, २९ जून २०२३, प्रतिनिधी : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अदा शर्मा सध्या समाज माध्यमांवर नेहमीच चर्चेत असते. अशातच आता अदाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पोश्टर गर्ल या चित्रपटातील ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणं गाताना दिसत आहे.
अदा शर्मानं आषाढी एकादशीनिमित्त हा एक खास व्हिडीओ समाज माध्यमांवर सामायिक केला आहे. या व्हिडीओमध्ये अदा ‘रखुमाई रखुमाई’ हे गाणं गाताना दिसत आहे. “आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा “विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा” असं कॅप्शन अदानं या व्हिडीओला दिलं आहे.
अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रामुख्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर द केरळ स्टोरी या चित्रपटाने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला ए उखड वळण दिले. अशातच अलीकडेच तिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर मराठीत काही कविता सादर केल्या त्यामुळे ती बरीच चर्चेत आली. त्यानंतर आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास व्हिडिओ सामायिक केल्यानंतर नेटकरी अदाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.