नेरुळ ब्रिजवर माशाने भरलेल्या टेम्पोला अपघात, मृतांच्या बाजुचे मासे वेचण्यासाठी झुंबड

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   सायन पनवेल महामार्गावर बघ्यांची असंवेदनशिलता दिसून आली. नेरुळ ब्रिजवर 5 गाड्यांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. यात माशांनी भरलेल्या एका टेम्पोचाही समावेश होता.   टेम्पो, ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी माणूस रस्त्याच्या कडेला पडला होता. पण बघ्यांनी मात्र पोलिसांना किंवा रुग्णवाहिकेला […]

नेरुळ ब्रिजवर माशाने भरलेल्या टेम्पोला अपघात, मृतांच्या बाजुचे मासे वेचण्यासाठी झुंबड

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

सायन पनवेल महामार्गावर बघ्यांची असंवेदनशिलता दिसून आली. नेरुळ ब्रिजवर 5 गाड्यांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. यात माशांनी भरलेल्या एका टेम्पोचाही समावेश होता.

 

टेम्पो, ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी माणूस रस्त्याच्या कडेला पडला होता. पण बघ्यांनी मात्र पोलिसांना किंवा रुग्णवाहिकेला बोलावण्याऐवजी माशांवर हात मारुन घेतला.

 

रस्त्याच्या कडेला पडलेल्या माशांच्या खचावर ही बघ्यांची गर्दी तुटून पडली. प्रत्येक जण माशेच गोळा करत होता. पण जखमी तसंच मृत व्यक्तीकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number