वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नीट परीक्षेचे निकाल जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
मद्रास हायकोर्टानं दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टानं उठवली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच नीट परीक्षा मागच्या वर्षीपासून सुरु झाली.
इंग्रजीबरोबरच विविध 10 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. त्यात प्रादेशिक भाषांतील परीक्षेची काठिण्यपातळी इंग्रजीच्या तुलनेनं कमी असल्याचा दावा करत
एका विद्यार्थ्यानं मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली.
त्यानंतर सुनावणी होईपर्यंत नीटचे निकाल राखून ठेवले जावेत, असं हायकोर्टानं म्हटले. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
अखेर सुप्रीम कोर्टानं ही स्थगिती उठवली आणि नीट परीक्षेचा निकाल तात्काळ म्हणजे आजच्या आज जाहीर केले जावेत, असे आदेशही सीबीएसई बोर्डाला दिले आहेत.