पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य आरोपी धनंजय लोखंडेच्या मित्राचाही या संपूर्ण रॅकेटमध्ये सहभाग असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. ओंकार शिंगोटे असं या तरुणाचं नाव असून त्याला सीबीआयने ताब्यात घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओंकार शिंगोटे हा जुन्नर येथील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, धनंजय लोखंडे आणि ओंकार शिंगोटे हे दोघे मित्र असून विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं काम करत होते. दरम्यान, पुणे पोलिस देखील मागील काही दिवसांपासून ओंकार शिंगोटेचा शोध घेत होते. सध्या तपास यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : Weather Update: कुठे ऊन तर कुठे पाऊस… तब्बल 13 जिल्ह्यांना अलर्ट; कोकणात वादळाची भीती?