NEET Paper Leaked Connection: नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडच्या अंबाजोगाईपर्यंत! CBI च्या चौकशीत मोठा खुलासा

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरला सीबीआयने पुण्यातून अटक केल्या आता आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे.

NEET Paper Leaked Connection: नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडच्या अंबाजोगाईपर्यंत! CBI च्या चौकशीत मोठा खुलासा

देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरला सीबीआयने पुण्यातून अटक केल्या आता आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. नीट घोटाळ्याचे कनेक्शन आता बीडच्या अंबाजोगाईपर्यंत पोहोचले आहे. अंबाजोगाई शहरातील काही विद्यार्थी लातूर येथे मोटेगावकर यांच्या क्लासमध्ये शिक्षण घेत होते. यातील काही विद्यार्थ्यांनी मोटेगावकर यांच्याकडून हा पेपर घेतल्याची माहिती असून त्याच्या चौकशीसाठी आता हे पथक अंबाजोगाई शहरात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- NTA On Paper Leak : NEET पेपरफुटी प्रकरण उघड झाल्यानंतर भौतिकशास्त्राचे प्रश्नही फुटले का ?; NTA ची CBI ला तपास करण्याच्या सूचना

चौकशीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षिका असलेल्या आईलाही प्रश्न विचारण्यात आल्याने तपासाची व्याप्ती वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या पी.व्ही. कुलकर्णीचे बीड कनेक्शन समोर आले आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या शिक्षक संघटनेचा शिवराज मोटेगावकर ब्रँड अँबेसिडर असल्याचं समोर आलं. बीड शहरातील शाहूनगर परिसरात अनेक कोचिंग क्लासेस आणि शिक्षण संकुले कार्यरत असून या भागाला शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं.

अशातच आता सीबीआयचे पथक चौकशी करून पुढे काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लीक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सध्या वेगाने सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number