नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या पण, नारायण राणेंनी उकरला जुना वाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विधानपरिषदेत आज शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे आणि काँग्रेस आमदार नारायण राणे  यांच्यामध्ये चांगलीच जुंपली.   कोकणातील माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले. तुम्ही तर केले नाहीत ना असा टोला नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना लगावला.   हे फक्त मातोश्रीवर पोहोचण्यासाठी आहे. मी स्वतः कबूल केलं आहे मला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले असे म्हणत नारायण राणेंनी […]

नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या पण, नारायण राणेंनी उकरला जुना वाद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधानपरिषदेत आज शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे आणि काँग्रेस आमदार नारायण राणे  यांच्यामध्ये चांगलीच जुंपली.

 

कोकणातील माणसाला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले. तुम्ही तर केले नाहीत ना असा टोला नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना लगावला.

 

हे फक्त मातोश्रीवर पोहोचण्यासाठी आहे. मी स्वतः कबूल केलं आहे मला बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले असे म्हणत नारायण राणेंनी निलम गोऱ्हेंच्या टीकेला उत्तर दिले.

 

मी वयाच्या 16 व्या वर्षांपासून शिवसेनेत जे केलं ते हे लोक मोजू शकत नाहीत. नीलम गोऱ्हे शिवसेना सोडून चालल्या होत्या. तेव्हा मी त्यांना थांबवले असे नारायण

राणे म्हणाले.

 

या जगात कुणालाही असच मुख्यमंत्री करत नाहीत. शिवसेनेत 39 वर्ष मी जे केलं ते यातल्या कोणी केलं ते सांगाव असं म्हणत नारायण राणेंनी निलम गोऱ्हेंवर निशाणा

साधला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number