Indurikar Maharaj New Video : ट्रोलिंगनंतर आता इंदुरीकर महाराजांचा दुसरा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, ‘कितीही बोंब मारा, लग्न तर…’

विवाह सोहळा मोठा का ठेवला याची त्यांनी स्पष्टीकरणासह जाहीर प्रतिक्रिया दिली असून, नवीन व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्या समर्थकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Indurikar Maharaj New Video : ट्रोलिंगनंतर आता इंदुरीकर महाराजांचा दुसरा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, ‘कितीही बोंब मारा, लग्न तर…’

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी अत्यंत भव्य पद्धतीने पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर सोशल मीडियावरून इंदुरीकर महाराजांवर टीकेची झोड उठली. “दुसऱ्यांना साधेपणाचे उपदेश देणारे महाराज स्वतः मात्र मुलीचा साखरपुडा धुमधडाक्यात साजरा करतात,” अशा प्रकारच्या कमेंट्स मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या. मुलीच्या पेहरावावरही काहींनी आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या, ज्यामुळे इंदुरीकर महाराज मानसिकरीत्या त्रस्त झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.

याच पार्श्वभूमीवर आता इंदुरीकर महाराजांचा आणखी एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी बदगी येथे झालेल्या कीर्तनातील हा व्हिडिओ असून, यात महाराज टीकेला स्पष्ट शब्दांत उत्तर देताना दिसत आहेत. इंदूरीकर महाराज म्हणाले "लोक बोंबलतील म्हणून कमी वयात मुलींची लग्न केली. मला माहिती होतं की हे लोकांमधून माझ्यावरती आरोप होणार आहेत. लग्न तर मी यापेक्षा टोलेजंग करणार आहे बघूच पुढे काय होतंय."

हेही वाचा: Sambhajinagar Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्या गर्भधारणेनंतर समोर आलं सत्य

पुढे इंदुरीकर म्हणाले "इकडे दुनिया लुटली काही लोकांनी तर यांची काय हिम्मत आहे मला बोलण्याची. 30 मिनिटाच्या सभेला तीन कोटी रुपये खर्च आहे कोणत्याही मीडिया चॅनलला तुम्ही हे विचारून पाहा. एखाद्याला किती त्रास द्यायचा याची मर्यादा आहे."

इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा संगमनेर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. मुलगी आणि जावयाची रथातून काढलेली राजेशाही मिरवणूक, वारकरी वेशातील टाळकरी, महिलांनी धरलेला फेर आणि उपस्थित मान्यवरांमुळे हा सोहळा पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सोहळा भव्य झाल्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावरून महाराजांवर व्यक्तिगत पातळीवर टीका केली. मात्र नवीन व्हिडिओमधून इंदुरीकर महाराजांनी या टीकेला स्पष्ट आणि ठाम शैलीत उत्तर दिले असून, त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्येही सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या नव्या विधानामुळे इंदूरीकर महाराज पुन्हा ट्रोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

हेही वाचा: New Mumbai Airport: ठरलं तर मग! 'या' तारखेला नवी मुंबई विमानतळावरून विमानाची पहिली भरारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number