क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मात्र न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला असून त्याची सुटका झाली आहे. तसेच आर्यन खानच्या ड्रग्जप्रकरणाचा तपास एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान भाजप नेते मोहित कम्बोज यांनी याप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील हेच आर्यनखान प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कम्बोज यांनी केला आहे.
आर्यन खानप्रकरणी भाजप नेते मोहित कम्बोज यांनी नवा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध असल्याचा दावा मोहित कम्बोज यांनी केला आहे.
सुनील पाटील हे एनसीपीचा कार्यकर्ते आहेत. मूळच्या धुळ्याचे असलेले सुनील पाटील यांचे २० वर्षापासून राष्ट्रवादीशी संबंध आहेत. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ते जिगरी दोस्त असून आर. आर. पाटील यांचेही ते निकटवर्तीय होते असा दावा मोहित कम्बोज यांनी केला आहे.