NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची नवी यादी पाठवणार; राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली काल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत सर्वांनी एकमताने ठराव मंजूर करत येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

तसेच सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्यामागे सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देण्यात आली. माध्यमांमध्ये बैठकीत वाद झाल्याच्या प्रसारित बातम्या पूर्णपणे निराधार व तथ्यहीन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असून पक्ष बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत.

हेही वाचा- Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणूक जागावाटप संबंधीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच; म्हणाले, ‘उद्यापर्यंत अधिकृतपणे जाहीर…’

यादरम्यान पक्षाच्या नव्या कार्यकारिणीवरून राष्ट्रवादीत नाराजीचे नाट्य सुरु होते. यासंदर्भात पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. नव्या कार्यकारणीमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या केवळ नावाचा उल्लेख होता मात्र पदाचा उल्लेख न केल्याने प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्या नाराजीचा सूर होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची सुधारित नवीन यादी लवकरच निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. 

नवख्या लोकांना कार्यकारणीत स्थान दिल्याने सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांची नाराजी होती. त्यावर नवीन कार्यकारणीमध्ये काही बदल करून निवडणूक आयोगाला यादी दिली जाणार असल्याची राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. यात आमदार सना मलिक यांच्याऐवजी आता हसन मुश्रीफ यांना स्थान देण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारणीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number