पवारांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीत मतांतर

देशात राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी  निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षनेत्यांमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीसाठी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच पवारांच्या उमेदवारीबाबत मतांतरे पाहण्यास मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ  आणि जितेंद्र आव्हाड यांनी पवारांच्या राष्ट्रपती उमेदवारीबाबत परस्परविरोधी भूमिका मांडली आहे. पवार […]

पवारांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीत मतांतर

देशात राष्ट्रपतींच्या नियुक्तीसाठी १८ जुलै रोजी  निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पक्षनेत्यांमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीसाठी पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच पवारांच्या उमेदवारीबाबत मतांतरे पाहण्यास मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ  आणि जितेंद्र आव्हाड यांनी पवारांच्या राष्ट्रपती उमेदवारीबाबत परस्परविरोधी भूमिका मांडली आहे.

पवार राष्ट्रपती होणे अभिमानास्पद – भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार राष्ट्रपती होणे अभिमानास्पद असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातून शरद पवार हे राष्ट्रपती यासारख्या मोठ्या पदावर गेल्यास महाराष्ट्र नक्कीच आनंदाची व गर्वाची गोष्ट करता राहील, असे छगन भुजबळ म्हणाले.

पवार राष्ट्रपती भवनात स्वत:ला कोंडू शकत नाहीत – आव्हाड

शरद पवार राष्ट्रपती झाल्यास महाराष्ट्राचा सन्मान असले, असे मत काही घटक पक्षांनी व्यक्त केलं आहे. मात्र, असे असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना राष्ट्रपती करू नये, असे म्हटले आहे. पवार राष्ट्रपती भवनात कोंडू शकत नाहीत, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

पवार राष्ट्रपती होण्यास काँग्रेसचा पाठिंबा

शरद पवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरावेत अशी इच्छा सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. तिथूनच राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरू लगाली.  नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. शरद पवारांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केले, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच महाराष्ट्र काँग्रेस पाठोपाठ आम आदमी पार्टीनेही पवार राष्ट्रपती व्हावेत अशी इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना खूप आनंद झालाय.

मात्र, शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वसनीय शिलेदार म्हणून ज्यांना ओळखले जाते ते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र वेगळाचू सूर आळवला आहे. आव्हाड यांना पवार राष्ट्रपती होण्यापेक्षा वेगळ्याच भूमिकेत पाहायचे असल्याची भावना आव्हाडांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रपती उमेदवारीबाबत राष्ट्रवादीतच मतांतरे असून भुजबळ आणि आव्हाड यांच्या परस्परविरोधी भूमिकेत दिसत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number