जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
नोटबंदीच्या वर्षपुर्तीचा निषेध करण्यासाठी आज पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले मंडईतील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून सुरु झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत काढण्यात आलाय.
यावेळी नोटबंदीवेळी केलेले सर्व दावे फोल ठरले असून आजच्या दिवसाच्या सेलेब्रेशन करणाऱ्या भाजपची कीव येतेय अशी टीका राष्ट्रवाीचे नेते अजित पवार यांनी केलीय.
तर, हे सरकार केवळ जाहीरातबाजीवर सुरु असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.