खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक…

जय महाराष्ट्र वेब न्यूज, नाशिक   गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा खड्यांचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावर आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन आंदोलन करत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.    मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले.तसेच खड्डे […]

खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक…
जय महाराष्ट्र वेब न्यूज, नाशिक
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा खड्यांचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावर आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयात जाऊन आंदोलन करत प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. 
 
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले.तसेच खड्डे न भरल्यास  आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मदत मिळवून देवू असेही तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिली.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे जोपर्यंत रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी लेखी स्वरुपात हमी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने केली.
 
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी आठ दिवसात रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद केला जाईल असे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
मुंबई आग्रा महामार्गावर खड्यांची संख्या अधिक वाढल्याने अनेक अपघात होत आहेत. या महामार्गावर २२ ऑगस्ट २०१८ रोजी २७ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे या खड्यांमुळे अनेक वाहनांचे टायर फुटल्याचेही निदर्शनास आले आहे. याबाबत नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत.
 
सदर रस्त्याच्या कायम देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या कंपन्यांनी रस्त्याची निगा न राखल्यामुळे दिवसेंदिवस रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जोपर्यंत टोल कंपन्यांकडून हा रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत या रस्त्यावरील टोल तात्काळ  बंद करावा. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने टोल बंद पाडला जाईल असा इशारा दिलीप खैरे यांनी दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number