सेंट्रल हॉलमधल्या सोहळ्याला विरोधकांची दांडी; राष्ट्रवादीची मात्र हजेरी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीच्या स्वागताचा सोहळा पार पडला.   मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.   लोकसभा तसेच राज्यसभेतले सर्व खासदार या सोहळ्याला उपस्थित होते. पण विरोधकांनी मात्र यावर बहिष्कार घातला होता.   काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, डावे तसंच […]

सेंट्रल हॉलमधल्या सोहळ्याला विरोधकांची दांडी; राष्ट्रवादीची मात्र हजेरी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

नवी दिल्लीत संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीच्या स्वागताचा सोहळा पार पडला.

 

मुख्य व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती.

 

लोकसभा तसेच राज्यसभेतले सर्व खासदार या सोहळ्याला उपस्थित होते. पण विरोधकांनी मात्र यावर बहिष्कार घातला होता.

 

काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, डावे तसंच इतर विरोधी पक्षांचे खासदार या सोहळ्यात हजर नव्हते. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र या सोहळ्याला हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे

अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते या सोहळ्याला हजर होते..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number