राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवला

आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २४ वर्षांनी राज्यसभा निवडणूक होणार असून राज्यात जागा सहा आहेत आणि सात उमेदवार रिगंणात उतरले आहेत. मात्र, मतदानाला सुरू होण्यापूर्वीच मविआसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीने उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे. राष्ट्रवादीने ४२ मतांचा कोटा ४४ इतका केला आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पवारांनी […]

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवला

आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २४ वर्षांनी राज्यसभा निवडणूक होणार असून राज्यात जागा सहा आहेत आणि सात उमेदवार रिगंणात उतरले आहेत. मात्र, मतदानाला सुरू होण्यापूर्वीच मविआसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीने उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे. राष्ट्रवादीने ४२ मतांचा कोटा ४४ इतका केला आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पवारांनी मतांचा कोटा बदलला आहे.

राज्यसभेची निवडणूक विजयी होण्यासाठी उमेदवाराला ४२ मतं लागणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दोन नेते अटकेत असल्यामुळे राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने ४२ मतांचा असलेला कोटा ४४ केला आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पवारांनी मतांचा कोटा बदलला आहे.

मतांचं गणित आहे तरी कसं?

राज्यसभेची निवडणूक विजयी होण्यासाठी उमेदवाराला ४२ मतं लागणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दोन नेते अटकेत असल्यामुळे राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने ४२ मतांचा असलेला कोटा ४४ केला आहे.

देशमुख आणि मलिक मतदान करू शकत नाहीत

अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत असल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number