सोलापुरात राष्ट्रवादीचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपमान झाला. अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत . गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस […]

सोलापुरात राष्ट्रवादीचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपमान झाला. अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत .

गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.या प्रकरणावरून सोलापुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले आहे. अजित पवार यांना भाषांसंधी न मिळाल्याने कार्यकर्त्याने मध्ये नाराजी दिसून येत आहे. याच नाराजीमुळे सोलापुरात आंदोलन करण्यात आले आहे. ‘अजित पवार महाराष्ट्राची अस्मिता, त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही’ अशी प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

या प्रकरणावर चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

चंद्रकांत पाटील यांनी असे सांगितले कि देहूत अजित पवारांनीच भाषण नाकारले मी शेजारी बसूनच सगळं ऐकले होते असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या आग्रहावर अजित पवार नको म्हणाले अशी माहिती चंद्रकांत पाटील पुण्यात असताना दिली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number