क्रुझवरील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आला आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. आणि एसआयटीचे पथक आता मुंबईत दाखल झाले आहे.
क्रुझवरील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आता एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आर्यन खान प्रकरणासह आणखी पाच प्रकरणांचा तपास एनसबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहे. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. आणि आज एसआयटीची टीम चौकशीकरण्यासाठ मुंबईत दाखल झाली आहे.
आयपीएस संजय सिहं, एनसीबी दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली आर्यन खान प्रकरणासह, समीर खान प्रकरण, अरमान कोहली प्रकरण, मुंब्रा एमडी प्रकरण, जोगेश्वरी चरस प्रकरण, डोंगरी एमडी प्रकरण या ६ प्रकरणांची चौकशी आयपीएस, एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.