लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून देशातील 12 राज्यांमधील 95 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. ओडिशामध्ये मतदानाच्या एक दिवासापूर्वी नक्षलवाद्यांनी महिला मतदान केंद्र अधिकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांनी मतदान अधिकाऱ्याची गाडी जाळली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ओडिशामधील ओडिशामधील कंधमाला जिल्ह्यात मतदानाच्या एक दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी महिला मतदान केंद्र अधिकाऱ्याची हत्या केली.
मतदानासाठी मतदान केंद्रवर जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली.
तर दुसरीकडे मतदान अधिकाऱ्याची गाडी जाळली असल्याची घटना घडली.
ही घटना फिरिंगिया पोलीस स्टेशनच्या एका गावाजवळ घडली आहे.
नक्षलवाद्यांनी आग लावण्यापूर्वी मतदान कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर काढले.
त्यानंतर या गाडीला आग लावल्याचे समजते आहे.
या गाडीमध्ये मतदानाचे सर्व सामन असून त्यात ईव्हिएम मशीन देखील होती.
मात्र त्या मशीनसोबत काय केले याची माहिती अद्याप समोर आली नाही.
सध्या लोकसभा निवडणूक सुरू असल्यामुळे नक्षलवादी नागरिकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास धमकी देत आहेत.
लोकसभा निवडणुकीमुळे नक्षलवाद्यांची कुरापती सुरू आहेत.