महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सी-६० पथकाचे १५ जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी भूसुरुंगस्फोट घडवल्यामुळे नागरिक संतप्त झाली. मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढवा असा सल्ला दिला आहे. तसेच आपणही यामध्ये सहभागी होऊ असे अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंगस्फोट सी-६० पथकाचे १५ जवान शहीद झाले.
हा हल्ला केल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक संतप्त झाली आहे.
मात्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नक्षलवाद्यांशी चर्चा करून मार्ग काढणार असून मध्यस्थी करण्यासाठी सहभागी होऊ शकतो असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे.
नक्षलवादी काही बाहेरचे नसून त्यांचे प्रश्न समजून घेऊन तोडगा काढला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच हा प्रश्न बंदुकीने सुटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चर्चा करून मार्ग काढण्यासाठी मी सहभागी होण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.