जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणलेल्या सीडीआर घोटाळ्यात आता आणखी माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या पत्नीचे सीडीआर मागवल्याचा आरोप आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 ने नवाजुद्दीन सिद्दीकी, त्याची पत्नी आणि त्यांचे वकील रिजवान सिद्दीकी यांना समन्स बजावण्यात आलं आहे. पत्नीचे काँटॅक्ट्स आणि ठावठिकाण्यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाझने सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स मागवल्याची माहिती आहे.
वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर काढले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र तीन वेळा बोलावूनही अद्याप नवाजुद्दीन चौकशीसाठी आलेला नाही.
सीडीआर प्रकरणी आतापर्यंत अनेक खासगी गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.