नवाब मलिकचा मुलगा अडचणीत

माजी मंत्री नवाब मलिकचा मुलगा फिरोज मलिक याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे मलिक कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मोहित कुंबोज यांनी आपल्या ट्वीटर वरून दिली. https://twitter.com/mohitbharatiya_/status/1615561877341491201?s=20&t=_lXbM8d4CM3SUNtQoFSo5A काय आहे प्रकरण? फिरोज मलिक यांना दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला […]

नवाब मलिकचा मुलगा अडचणीत

माजी मंत्री नवाब मलिकचा मुलगा फिरोज मलिक याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे मलिक कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. व्हिसासाठी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मोहित कुंबोज यांनी आपल्या ट्वीटर वरून दिली.

https://twitter.com/mohitbharatiya_/status/1615561877341491201?s=20&t=_lXbM8d4CM3SUNtQoFSo5A

काय आहे प्रकरण?

फिरोज मलिक यांना दुसरी बायको असल्याचा दावा करण्यात आला असून तिचे नाव लॉरा हॅमलिन असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्या एक फ्रेंच नागरिक आहेत. फराज मलिक यांना भेटण्यासाठी लॉराने भारतीय व्हिसासाठी त्यांनी कागदपत्र दाखल केली होती.

मुंबई स्पेशल क्राईम ब्रँच २ यांच्याकडे व्हिसासंदर्भातील प्रकरणे येत असतात. याप्रकरणी दाखल तक्रारीवर या कागदपत्रांची पडताळणी केली.  या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यामध्ये असं निष्पण्ण झालं की, दोघांच लग्न हे खोटं आहे. मुंबई महापालिकेला यासंदर्भात चौकशी करण्याची सूचना दिली आहे. खोटं लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, माजी मंत्री नवाब मलिक हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटकेत असून त्यातच आता फिरोज मलिक याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे मलिक कुटुंबाच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number