‘नवाब मलिक दहशतवाद्यांना साथ देणारा देशद्रोही’ – नितेश राणे

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळावे या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही आरोप […]

‘नवाब मलिक दहशतवाद्यांना साथ देणारा देशद्रोही’ – नितेश राणे

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करावे आणि एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ मिळावे या मागण्यांसाठी राज्यात एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यातच भाजप नेते नितेश राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावरही आरोप केला आहे.

  नवाब मलिकांविरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी मलिकांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, नवाब मलिक गद्दार आहेत. तसेच मलिक हे अतिरेक्यांना साथ देणारा देशद्रोही आहे, त्याच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देता कामा नये, त्याला पाकिस्तानला हाकलून द्या, असे म्हणत नितेश राणे यांनी मलिकांवर टीका केली आहे. तसेच नवाब मलिक मंत्रिमंडळात कसे आहेत? असा सवाल उपस्थित करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

  गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही आरोपांनी घेरले आहे. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिकांचे कौतुक केल आहे तर आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. त्यामुळे यावर भाजप नेते मलिकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत.

मलिकांना शिवसेनेचा पाठिंबा

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी मलिकांना पाठिंबा दर्शविला आहे, त्यामुळे या लढाईत नवाब मलिक एकटे नाहीत. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number