…म्हणून निवडणुकीत 300 कोटी खर्च केले; नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड नांदेड पालिका निवडणुकीत भाजपने मोपलवार यांच्या पैशाचा वापर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी, मोपलवार हे नांदेड मधील रहिवाशी असल्याने आपल्यावरील आरोप कमी व्हावेत यासाठी त्यांनी नांदेड पालिका निवडणुकीत 300 कोटी रुपये खर्च केल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘हा संपूर्ण पैसा समृद्धी महामार्गातील […]

…म्हणून निवडणुकीत 300 कोटी खर्च केले; नवाब मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

नांदेड पालिका निवडणुकीत भाजपने मोपलवार यांच्या पैशाचा वापर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी, मोपलवार हे नांदेड मधील रहिवाशी असल्याने आपल्यावरील आरोप कमी व्हावेत यासाठी त्यांनी नांदेड पालिका निवडणुकीत 300 कोटी रुपये खर्च केल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘हा संपूर्ण पैसा समृद्धी महामार्गातील भ्रष्ट्राचाराचा आहे. दरम्यान, चौकशी समितीमधून प्रवीण पडवळ यांना बाहेर काढावे’, अशी मागणी ही नवाब मलिक यांनी केली. तसेच, ‘भाजपला रोखल्याबद्दल मी काँग्रेसचे अभिनंदन करतो’, अशा शब्दांत मलिक यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number