जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई सिडकोच्या माध्यमातून बंप्पर घरांची लाॅटरी निघणार आहे. हक्काचं घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सिडकोने एकाच वेळेस तब्बल १४ हजार ८३८ घरांची लाँटरी काढली असून याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे […]
सिडकोच्या माध्यमातून बंप्पर घरांची लाॅटरी निघणार आहे. हक्काचं घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सिडकोने एकाच वेळेस तब्बल १४ हजार ८३८ घरांची लाँटरी काढली असून याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी याचा फायदा होणार आहे.
नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत.
ही आहे सिडकोची प्रक्रिया –
येत्या १३ आँगस्ट रोजी घरांची लाॅटरी निघणार आहे.
१५ आँगस्ट ते १६ सप्टेंबर पर्यंत आँनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १८ लाखाचे घर असून २५.८१ चौ.मी. एवढी त्याची जागा आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी २६ लाखचे घराचा ऐरीया २९.८२ चौ.मी चा आहे.
लाँटरीच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही घरे २०१९ च्या शेवटाला यांचा ताबा देण्यात येणार आहे.
आर्थिक दुर्बल गटासाठी उत्पन्न मर्यादा ही २५ हजार रूपये ठेवण्यात आली आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा २५००१ ते ५० हजार ठेवण्यात आली आहे.
५० हजार रूपयांच्या वर महिन्याचे उत्पन्न असणार्या व्यक्तीला सिडको लाँटरी मध्ये घर घेता येणार नाही.
दरम्यान या घरांसाठी प्रधानमंञी आवास योजनेचा देखील लाभ घेता येणार आहे.